तनपुरेंनी राहुरी तालुक्‍यात विधानसभेचे रणशिंग फुंकले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राहुरी  तालुक्‍यात राष्ट्रवादीच्या झालेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा तर मिळालीच; परंतु यानिमित्ताने लोकनियुक्‍त नगराध्यक्ष प्राजक्‍त तनपुरे यांचे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपासून तालुक्‍यात राष्ट्रवादीची ताकद क्रमाक्रमाने वाढत गेली. ती आजतागायत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकात वाढतानाच दिसत आहे. यामुळे प्राजक्‍त तनपुरे यांना ऊब तर मिळालीच, पर्यायाने विद्यमान भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना मात्र उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी हुडहुडी भरल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी होत असल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत. आघाडी झाली तरी राहुरीची जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार आहे. त्यादृष्टीने तनपुरे पूर्वीपासूनच तयारीला लागले आहेत. या ना त्या कारणामुळे नेहमीच ते गावागावातून कार्यक्रमांमध्ये झळकताना दिसतात. त्यात कोणतेही आंदोलन असो वा गावागावातील क्रिकेटचे सामने असो, तरुणाईचे ते आकर्षण ठरले आहेत. 

याच्या जोडीला त्यांचा सर्वसमावेशक स्वभावही कामाला येत आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या नेटवर्कबरोबर त्यांनी नवीन तरुणाईचे मोठ्या प्रमाणात संघटनही वाखाणण्याजोगे आहे नि ते गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकात एकसंध दिसते. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक वगळता इतर निवडणुकांत त्यांचा वरचष्मा राहिल्याचे राजकीय जाणकारांना नाकारता येणार नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पंचायत समिती निवडणुकीत चाणाक्ष पध्दतीने व्यूहरचना करत शिवाजी गाडे, “प्रेरणा’चे अध्यक्ष सुरेश वाबळे, अजित कदम, अरुण कडू, आदींच्या सहकार्याने पंचायत समिती पूर्ण बहुमताने ताब्यात घेण्यात ते यशस्वी झाले. याउलट या ना त्या कारणाने भाजपपासून मतदार दुरावत चालला असल्याचाही फायदा ते चाणाक्षपणे उठवत आहेत. डॉ. विखे यांनी या घडीपर्यंत तरी तालुक्‍यात फक्त कारखान्यापुरताच मर्यादित संबंध ठेवला आहे.

दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी कारखाना सुरू करून त्याला पुढे अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी ऊसउत्पादक व सभासदांवर जबाबदारी टाकली आहे. आम्हाला मदत करा, बदल्यात तुमची जागा तुमचीच राहील, असे आश्‍वासन त्यांनी आ. कर्डिले यांना दिले आहे. ते हे आश्वासन पाळतील का ? यावरही आ. कर्डिले साशंक असून त्यादृष्टीने नेहमी प्रत्येक कार्यक्रमात बोलत असतात. 

परंतु, राजकारणात कुणी कुणाचा शत्रू वा कुणी कुणाचा दूरदूरपर्यंत मित्रही नसतो हे धूर्त कर्डिले ओळखून आहेत. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त प्राजक्‍त तनपुरे यांनी संपूर्ण तालुक्‍याचा झंझावाती दौरा केला. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन हे आंदोलन यशस्वी करून दाखविले. ते दिसलेल्या विराट जनसमुदायावरून वरिष्ठ नेतेमंडळींच्या नजरेस भरले म्हणूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जून आपल्या भाषणातून तालुक्‍याचा विकास बारामतीइतकाच तळापासून करण्याचे भरगच्च सभेत आश्‍वासन दिले. 

धूळखात पडलेल्या मिनी एम.आय.डी.सी.ला बारामतीसारखे स्वरूप जरी आले तरी तालुक्‍यातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रभावी असलेला प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास यामुळे मदत होणार हे निश्‍चित.त्याचप्रमाणे एस.टी. डेपोचा प्रश्‍न सुटल्यास छोट्या-मोठ्या उद्योगांना त्यामुळे उभारी मिळण्यास मदतच होणार आहे. 

प्राजक्‍त तनपुरे यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. परंतु, त्याला आज मर्यादा आहेत. आगामी विधानसभेत त्यांचा प्रवेश झाल्यास या व्हिजनला आणखी पंख फुटतील. मात्र, त्यांना आज असलेले तालुक्‍याचे राजकीय वातावरण आहे त्यापेक्षा वाढवावे लागणार हेही निश्‍चित.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.