छिंदमचे उपमहापौरपद गेले आता नगरसेवकपदाची वेळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवद्रोही श्रीपाद छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा आज महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला. उपमहापौर पद गेले असले तरी अजून छिंदमचे नगरसेवक पद आबाधित आहे. 18 नगसेवक आणि स्थायी समितीच्या सहा सदस्यांनी छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची लेखी मागणी केली आहे. यासाठी विशेष महासभा बोलविण्याची त्यांची मागणी आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पुढील आठवड्यात महासभा घेण्याचे संकेत महापौर कदम यांनी दिले आहेत. शिवजयंती व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उपमहापौर छिंदम यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. हे प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले. त्यामुळे भावना तीव्र झालेल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. तर मनपाचे कामकाज देखील ठप्प झाले होते. वेगाने हा विषय राज्यभर पोचल्यावर राज्यात निदर्शने होऊ लागली होती. सर्व निदर्शने व छिंदमच्या
निषेधार्थच्या विविध क्‍लीप व छायाचित्रांनी या दरम्यान सोशल मीडिया व्यापला होता. तर छिंदमने देखील माफी मागणारी व्हिडिओ क्‍लीप सोशल मीडियावर अपलोड केली होती. 

परंतु, त्याला माफ करण्याच्या मानसिकतेत सोशल मीडिया नव्हता. तर त्याच्या अटकेची मागणी देखील जोर पकडून होती. दिवस अखेर छिंदमला अटकही झाली आणि वातावरणातील तणाव काहिसा निवळला. परंतु, त्याच्या उपमहापौर व नगरसेवक पदाच्या राजीनामाची मागणी देखील जोराद स्वरूपात पुढे आली होती. त्यावर छिंदमने पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्याकडे शुक्रवारी सादर केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
परंतु, राजीनामा दुसऱ्या दिवशी दुपारनंतरपर्यंत महापौर कार्यालयात पोहचला. परंतु, महापौर कदम येथे नसल्याने त्यावर लगेच निर्णय झाला नाही. मात्र, आज सकाळी सुरेखा कदम कार्यालयात पोहचताच छिंदमचा राजीनामा मंजूर केला. तो पुढील कारवाईसाठी आयुक्तांकडे पाठविला. छिंदमचे उपमहापौरपद गेले असले तरी नगरसेवक पद रद्द करण्यासाठीचा दबाव कायम आहे. आतापर्यंत 18 नगरसेवक व स्थायी सहा सदस्यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.

कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी ही विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांच्यासह चार नगरसेवकांचे सुरूवातीला यासाठी पत्र दिले होते. त्यांनतर आज स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, बाबासाहेब वाकळे, संजय शेंडगे, दत्तात्रय कावरे, उषा नलवडे, अनिता राठोड, समद खान आदींनी याबाबत पत्र दिले. आता याबाबत पुढील आठवड्यात विशेष महासभा बोलावून निर्णय करण्याची तयारी सुरू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.