माळवाडगावला विवाहितेच्या अंत्यविधीवेळी गोंधळ, चिठ्ठीतील मजकुराने पोलीस चक्रावले!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील विवाहितेच्या आत्महत्येनंतर तिच्या पार्थिवावर काल तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंत्यसंस्काराचा विधी आटोपत असतानाच माहेरकडील मंडळींनी तिच्या पतीच्या दिशेने मारहाणीसाठी धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे भान राखत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अडीच महिन्यापूर्वी विवाह झालेली तरुणी अनुश्री उर्फअनिता जालिंदर आसने हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांवर घातपाताचा संशय व्यक्त करत खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्यामुळे शवविच्छेदनास दोन दिवसांचा कालावधी लागला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रथम नगर व तेथून औरंगाबादला पाठविण्यात आला. सोमवारी (दि. १९) दुपारी माळवाडगावला पार्थिव आल्यानंतर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी दोन्हीकडील नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
परिस्थिती तणावग्रस्त असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. अंत्संस्काराचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या क्षणी पार्थिवाभोवती पती जालिंदरकडून तीन फेऱ्या पूर्ण करून मडके अग्नीवर फोडताच विवाहितेच्या मावशी व दोन तरुणांनी त्याच्यावर हल्ला चढविला. 

त्याचवेळी माहेरकडील अन्य नातेवाईकांनी तिरडीच्या माडाचे बांबू मारहाणीसाठी उपसले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात येताच नातेवाईक व ग्रामस्थांनी पळापळ सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. .

पोलिसांनी पती जालिंदर आसने, सासरा शिवाजी व सासू उषा आसने यांना खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आणले. तसेच माहेरकडील नातेवाईकांना पोलीस बंदोबस्तात गावाबाहेर सोडण्यात आले.

चिठ्ठीतील मजकुराने पोलीस चक्रावले!
अनिताने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. यात मावशीला उद्देशून बराचसा मजकूर लिहिलेला आहे. तसेच शेवटी खोटं बोेलणारी अनू असे लिहित मला माफ करा असाही उल्लेख आहे. 

तसेच नेवासा तालुक्यातील नातेवाईकाकडे इयत्ता ११ शास्त्र शाखेत शिक्षण घेत असतानाच तिचा अडीच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. घटनेआगोदर काही दिवसांपूर्वी परीक्षा देवून ती सासरी परतली होती. या घटनेच्या तपासात अनेक गोष्टी उजेडात येत असल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.