महिलांच्या कपड्यांच्या दुकानात कॅमेरा,महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील शिवम कलेक्शन लेडीज वेअर या कापड दुकानातील चेंजीग रुममध्ये कॅमेरा असल्याची फिर्याद एका विवाहित तरुणीने राहुरी पोलिसांत दाखल केल्याने तालुक्यातील महिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहुरी येथील जोगेश्वरी आखाडा येथे राहणारी एक विवाहित तरुणी आपल्या पती सोबत १३ फेब्रुवारी रोजी राहुरी फॅक्टरी येथील शिवम कलेक्शन लेडिज वेअर या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेले होती. सदर तरुणी कपडे खरेदी केल्यानंतर कपडे घालून पाहण्यासाठी चेंजीग रुममध्ये गेली असता तीला तेथे दोन कॅमेरे असलेले मोबाईल ठेवलेले दिसले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सदर तरूणीने घरी जात असताना आपल्या पतीला या छुप्या मोबाईलची माहिती दिली. परंतू त्यांना घाई असल्याने ते नगरला निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी सदर पती-पत्नी कपडे बदलून घेण्यासाठी त्या दुकानात गेले व तरुणीच्या पतीने दुकानचे मालक संदिप पांडूरंग बोचकरे याला चेंजीग रूममधील छुप्या मोबाइलबाबत विचारणा केली. त्यावेळी संदिप याचा भाऊ राजू पांडूरंग बोचकरे हा तेथे आला व दोघांनी सदर तरुणीची ओढणी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी तरुणीचा पती व पत्नीला लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.