नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 529 कोटी वर्ग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 2 लाख 70 हजार 889 लाभार्थीं शेतकऱ्यांसाठी 551 कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यापैकी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 529 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असणाऱ्या एकूण सहा ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या आहेत. 10 हजार 373 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असणारी सहावी ग्रीन लिस्ट शिवजयंतीच्या दिनी राज्य सरकारकडून सहकार विभागास प्राप्त झाली असून, जिल्ह्यास आणखी उर्वरित लाभार्थ्यांसाठी निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केल्यानंतर 24 जुलै ते 22 सप्टेंबरदरम्यान पात्रतेचे निकष घोषित करून शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. जिल्हाभरात या योजनेसाठी तब्बल 3 लाख 76 हजार अर्ज प्राप्त झाले होते. राज्यात सर्वाधिक संख्येने नगर जिल्ह्यातून या योजनेसाठी अर्ज दाखल झाले होते. गावपातळीवर पडताळणी, छाननी करीत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या घोषित करण्यात आल्या. 

अखेर या बहुचर्चित योजनेच्या लाभाचा प्रत्यक्ष शुभारंभ जिल्हास्तरावर पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते 18 ऑक्‍टोबर 2017 रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करताना जिल्ह्यातील 25 शेतकरी दाम्पत्यांना कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. नंतर क्रमशः 19 फेब्रुवारीपर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या एकूण सहा ग्रीन लिस्ट जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या. या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्गही करण्यात आले आहेत.

गतवर्षातील सप्टेंबरपासून सुरू असलेले कर्जमाफीचे काम नववर्षातही सुरूच आहे. अजून कमीत-कमी 2 महिने हे काम सुरू राहण्याची शक्‍यता आहे. कर्जमाफीच्या पहिल्या ग्रीन लिस्टमध्ये दोन हजार 354 शेतकऱ्यांचा समावेश होता; त्यापैकी 2 हजार 331 शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 कोटी 31 लाख 52 हजार 962 रुपये वर्ग करण्यात आले. दुसऱ्या ग्रीन लिस्टमध्ये 5 हजार 128 शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी 1 हजार 85 शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी 12 लाख 23 हजार 492 रुपये जमा करण्यात आले आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तिसऱ्या ग्रीन लिस्टमध्ये जिल्ह्यातल्या 77 हजार 939 शेतकऱ्यांचा समावेश होता. 55 हजार 671 शेतकऱ्यांच्या खात्यावर 265 कोटी 70 लाख 81 हजार 260 रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली. चौथ्या ग्रीन लिस्टमध्ये सर्वाधिक 1 लाख 12 हजार 44 शेतकऱ्यांचा समावेश होता. तर, पाचव्या ग्रीन लिस्टमध्ये समावेश असणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 50 हजार 162 एवढी होती. 

मागील 5 दिवसांपूर्वी 12 हजार लाभार्थ्यांचा समावेश असणारी आणि शिवजयंती दिनी अर्थात 19 फेब्रुवारी रोजी 10 हजार 373 शेतकऱ्यांचा समावेश असणारी लिस्ट प्राप्त झाली असून, निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. असे एकूण 2 लाख 70 हजार 889 शेतकऱ्यांच्या खात्यावर 529 कोटी वर्ग करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.