नवऱ्याच्या जाचास कंटाळून पोलिस अधीक्षक कार्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नवऱ्याच्या जाचास कंटाळून विवाहीत महिलेने बुधवारी (दि. ३१) सकाळी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी सदर महिलेविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्षा अमोल सोनवणे (वय २७, रा. चापडगाव, ता. कर्जत) या महिलेने पती शारीरिक व मानसिक त्रास देत असल्यामुळे याबाबत दिलासा सेलमध्ये गेल्या महिन्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी ३१ जानेवारीस होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

परंतु सुनावणीस पती हजर न राहिल्यामुळे तिने दिलासा केंद्राच्या बाहेर येऊन पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या गेटजवळ विषारी औषध प्राशन केले. पोलिस कर्मचाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी सदर महिलेस जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर या महिलेस भावाच्या ताब्यात देण्यात आले असून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल तिच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.