जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत ठेवण्यास उत्तरेतील काँग्रेसचे पुढारी कारणीभूत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत ठेवण्यास उत्तरेतील काँग्रेसचे पुढारी कारणीभूत अाहेत. जिल्हा विभाजनास काँग्रेसचाच अडसर असल्याचा आरोप करत जिल्हा विभाजनासाठी पालकमंत्री राम शिंदे यांच्या पाठीशी संपूर्ण जिल्हा उभा करू, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पत्रकात त्यानी म्हटले आहे की, नव्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे असावे, याबाबत काँग्रेस पुढाऱ्यांत एकमत नसल्याने विरोध होत आहे. २०१४ पर्यंत काँग्रेसची सत्ता असताना आणि उत्तर विभागातील सर्वात जास्त मंत्री असताना केवळ हेवेदावे करत या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.

पालकमंत्री शिंदे यांनी याप्रश्नी लक्ष घातल्याने काहींच्या पोटात दुखत असून त्यांच्यावर बेछूट आरोप करून विषयाला कलाटणी देण्याचे काम या मंडळीकडून केले जात आहे. पालकमंत्री उत्तरेतील नसल्याने मुख्यालयाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

ज्यांनी शिर्डी नगरपंचायतीला क वर्ग नगरपालिका करण्यास विरोध केला, ते शिर्डीला जिल्ह्याचे मुख्यालय करावे, अशी वल्गना करून भांडणे लावत आहेत. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय कोठे असावे, याबाबत पुनर्रचना समिती निर्णय घेईल, असे गोंदकर यांनी नमूद केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.