भगवानगड रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू करताच ग्रामस्थ आक्रमक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खरवंडी कासार ते भगवानगड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करत खरवंडी कासार व परिसरातील ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. परंतु ठेकेदाराने ग्रामस्थांना न जुमानता काम चालू ठेवले. निकृष्ट दर्जांचे काम चालू असल्याचे समजताच ग्रामस्थ आक्रमक झाले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत आमची तक्रार असताना तुम्ही काम कसे सुरू केले, असा जाब विचारला. ठेकेदारावर तुमचे नियंत्रण नसून आशीर्वाद आहे. गुण नियंत्रण विभागाकडून काम व खडीच्या दर्जाची तपासणी होऊन हा अहवाल आल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही, असा पवित्रा घेत सुरू असलेले काम ग्रामस्थांनी बंद केले.

यावेळी युवा नेते किरण खेडकर, माजी उपसरपंच राजेंद्र जगताप, सुरेश केळगंद्रे, रामजी ढाकणे, शिवनाथ ढाकणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खेडकर म्हणाले, आम्हाला रस्त्याची लांबी, रुंदी, जाडी महत्त्वाची नसून कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे. निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

केळगंद्रे म्हणाले, भगवानगडाचा रस्ता दर्जेदार व्हावा, अशी आमची इच्छा आहे. काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थांची असून आम्ही काम बंद आंदोलन केले होते. परंतु आमच्या आंदोलनाला न जुमानता काम चालूच राहिले. याचा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. दरम्यान, तालुक्यात व जिल्ह्यात अन्यत्र अशाच स्वरूपाची निकृष्ट कामे सुरू असल्याची चर्चा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.