माजी उपमहापौरांची पीएसआयला जिवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : मंगलगेट परिसरातील एका जुगार अडड्यावर छापा टाकला असता त्यातील आरोपींना सोडण्याची मागणी माजी उपमहापौरांनी केली असता तसे करण्यास नकार देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून मंर्त्यांशी ओळख असल्याचे सांगत ट्रॅपमध्ये अडकवण्याचेही म्हटले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस उपनिरीक्षक विशाल सणस यांनी बुधवारी (दि.३१) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मंगलगेट हद्दीत एका जुगार अडड्यावर छापा टाकला होता. यावेळी एका आरोपीस अटक करण्यात आली तर काही जण पसार झाले.

दरम्यान अटक केलेल्या आरोपीस सोडून देण्यासाठी चंद्रकांत सातपुते हे मंगलगेट चौकी येथे आले. त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून सणस यांची खांडरे यांच्याशी बोलणी करून दिली असता यावेळी खांडरे म्हणाले की, मी माजी उपमहापौर बोलत असून अटक केलेल्या आरोपीस सोडून द्या असे म्हटले. यावेळी सणस यांनी कायदेशीर कारवाई केल्याचे सांगत कोणाला सोडता येणार नसल्याचे म्हटले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तेव्हा खांडरे यांनी माझी मंर्त्यांसोबत ओळख असून तुम्हाला खोट्या ट्रॅपमध्ये अडकवून पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करेल. तसेच वेळ पडल्यास तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी सणस यांना दिली. याप्रकरणी सणस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. प्रकाश पाटील हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.