साईसंस्थानच्या तुप खरेदीची एसआयटी मार्फत चौकशी करा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : साईबाबा संस्थानच्या तुप खरेदीत पुरवठादाराने काही विश्वस्त व अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची एसआयटी मार्फत तत्काळ चौकशी करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाने मुख्यमंर्त्यांकडे पाठवावा. अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व सबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला दिला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हरीयानातील एका तुपाच्या पुरवठादाराने टेंडर पोटी आपण काही विश्वस्त व अधिकाऱ्यांना लाखो रूपयांची लाच दिल्याचे ८ डिसेंबर रोजी व्यवस्थापनाच्या बैठकीत सांगितले. त्यासंबधी पुरावे असल्याचेही त्याने पत्राद्वारे कळवल्याचे समजते. याशिवाय खा.सदाशिव लोखंडे यांनीही पत्रकार परिषद घेवुन तुप खरेदीत विश्वस्त व अधिकाऱ्यांना लाखो रुपये दिल्याचा आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मात्र या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. हे प्रकरण आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, लाचखोरीचे असून त्यामध्ये विश्वस्त व वरिष्ठ अधिकारी सामिल असल्याचे आरोप होत असल्याने सदर प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे करून पाठवावा व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. अन्यथा सर्व विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी व संबंधित पुरवठादार यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.