श्रीगोंद्यात तरूणांची पोलिसांना धक्काबुकी,राजकारण्यांकडून तरुणांची पाठराखन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात गुरूवार दि.१ रोजी दुपारी दीड वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ घालून, मुलींना त्रास देणाऱ्यांना समजावयास गेलेल्या श्रीगोंदा पोलीस कर्मचाऱ्यांनाच या मुलांनी धक्काबुकी केली. याबाबत प.कॉ किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून दोन तरुणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात गुरूवारी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता.यावेळी काहीजन जागेवरून उठून मुलींच्या दिशेने हातवारे करून मोठमोठ्याने ओरडून,गोंधळ घालत होते. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कॉ.राऊत व बोराडे यांनी त्यांना शांत बसून व्यवस्थित कार्यक्रम पाहण्याची समज दिली. परंतु या मुलांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने पो.कॉ बोराडे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्याला माहिती दिली.

त्यानुसार पो.कॉ.प्रकाश वाघ, अविनाश ढेरे, प्रताप देवकाते, दादा टाके आदी आले व त्यांनी या मुलांना समजावले. त्यावर दोघांनी आम्ही बाहेर येणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. असे म्हणत पो.कॉ.बोराडे व राऊत यांच्यावर धावून जात त्यांना ढकलून देऊन खाली पाडून दुखापत केली. त्यांना शिवीगाळ केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी या दोघांना बाहेर आणून, त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे ऋषिकेश विजय तारे रा.दत्तचौक काष्टी, महेश सुनील मोटे रा.घोडेगाव असे आहेत.या दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणत, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.तसेच या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

राजकारण्यांकडून तरुणांची पाठराखन.
दरम्यान आज ही घटना घडली, तेव्हा काही जेष्ठ राजकीय नेतेदेखील त्याठिकाणी उपस्थित होते. परंतु त्यांनी या तरुणांना समजावण्यापेक्षा पोलिसांनाच समजावत तरुणांवर कारवाई करू नका. असे सांगत या तरुणांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मात्र सर्व दबाव झुगारून कारवाई केली. .

राजकीय हस्तक्षेपामुळेच उनाड तरुणांना पाठबळ.
दरम्यान अशा काही घटना घडल्या की, या उनाड तरुणांना वाचवण्यासाठी तालुक्यातील काही राजकीय नेत्यांकडून पोलिसांवर या मुलांवर कारवाई न करण्याबाबत दबाव टाकला जातो आणि अशा उनाड तरुणांना या राजकीय लोकांनी पाठीशी घातल्यामुळेच त्यांना पाठबळ मिळते.त्यामुळेच थेट खाकी वर्दीलाच हात घालण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.