'आ.शिवाजीराव कर्डिले यांचे काम चांगले' - खा.नाना पटोले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम आ.शिवाजीराव कर्डिले करत असून पक्ष, गटतट बाजूला ठेवून ते काम करतात. जिल्ह्यात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी केले.भाजपाला रामराम ठोकून नुकतेच काँग्रेसवासी झालेले मा.खा.नाना पटोले यांनी आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ते म्हणाले, आ. कर्डिले हे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी आहेत. कामे करताना पक्षविरहित काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आमची अनेक वर्षांपासून पक्षविरहीत मैत्री असल्याचेही त्यांनी सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मा.खा.नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक शहाजी ठाकूर, विक्रम भुजाडी, न.पा.विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, गणपत उंडे, सुनिल कवडे, उमेश शेळके, कुंदन बाचकर, अरूण साळवे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.