अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा शिवाजीयन्स् एफसी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : शिवाजीयन्स् एस.सी. यांच्या वतीने आयोजित चौथ्या कै. अ‍ॅलेक्स् फर्नांडेझ करंडक 2018 स्पर्धेत अहमदनगरच्या व आयोजक शिवाजीयन्स् एफसी संघाने सिटी क्लब संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून ड गटातून उपांत्य फेरी गाठली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
फोर्ट (किला) मैदान, अहमदनगर क्लब लिमिटेड जवळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ड गटाच्या सामन्यात शिवाजीयन्स् एससी संघाने दणक्यात सुरूवात करताना कमलनयन कुमार याने दुसर्‍याच मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशा आघाडीवर नेले. त्यानंतर शिवाजीयन्स् संघाने जोरदार खेळ करून 15 व्या मिनिटाला आकाश गायकवाड याने केलेल्या गोलाच्या जोरावर आघाडी 2-0 अशी फुगवली. 

पुर्वार्धात ही आघाडी कायम होती. उत्तरार्धात पिछाडीवरून खेळणार्‍या सिटी क्लब संघाने चांगला खेळ केला. सिटी क्लब एफसीच्या सुदेश सुर्यवंशी याने 32 व्या मिनिटाला गोल करताना संघाची आघाडी 1-2 अशी कमी केली. पण शिवाजीयन्स् आणखी गोल होऊ न देण्याची खबरदारी घेत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. ब गटात शिवाजीयन्स् संघाचे 6 गुण तर, सिटी क्लबचे 3 गुण झाले आहेत. या गटातून फ्रेन्डस् एफसी संघाने 6 गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे. 

क गटाच्या सामन्यात अहमदनगर महाविद्यालय संघाने आंबेडकर एफसी संघाचा 3-1 असा पराभव केला. अहमदनगर संघाकडून पुतेन याने दोन तर, चिशी याने एक गोल केला. आंबेडकर एफसीकडून कृष्णा याने एक गोल केला आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकालः 
गट कः अहमदनगर महाविद्यालयः 3 (पुतेन 36, 37 मि., चिशी 55 मि.) वि.वि. आंबेडकर एफसीः 1 (कृष्णा 19 मि.);
2) गड डः शिवाजीयन्स् एससी, नगरः 2 (कमलनयन कुमार 2 मि., आकाश गायकवाड 15 मि.) वि.वि. सिटी क्लब एफसीः 1 (सुदेश सुर्यवंशी 32 मि.);

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.