श्रीरामुपरच्‍या तरुणाच्या खूनप्रकरणी तीन सख्खे भाऊ अटकेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामुपरच्‍या तरुणाच्या खूनप्रकरणी कोपरगावातील दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्‍यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या तपासात आणखी तीन आरोपी मिळुन आल्‍याने आता आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीरामपुरच्‍या अमानत नागरी पतसंस्थेत कलेक्‍शन प्रतिनिधी म्‍हणुन काम करणारे अकबर रज्‍जाक तांबोळी (३८, रा. श्रीरामपूर) हे शनिवारी धुळ्याला लग्‍नाला जाण्यासाठी कोपरगाव येथे साई तपोभुमी चौकात दुपारी ४.३० वाजेच्‍या समारास उतरले व गाडीची वाट पाहात उभे होते.

सायकलचा धक्‍का लागल्‍याने शिवीगाळ केली, याचा राग आल्‍याने साईनाथ मच्छिंद्र त्रिभुवन व प्रवीण विष्णू नेटारे, सचिन मच्छिंद्र त्रिभुवन (२३), दशरथ मच्छिंद्र त्रिभुवन (१९, सर्व रा. साईनगर, कोपरगाव) या भागातील असून शेख अमिन हुसेन उदगड्या हा रामवाडी संवत्‍सर येथील रहिवासी आहे. 

या पाच जणांनी त्‍यांना बेदम मारहाण केली. त्‍यात तांबोळी यांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी रात्री वरील दोन्‍ही आरोपींना पोलिसांनी अटक करून ताब्‍यात घेतले, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. या प्रकरणात साईनगर येथे राहाणारे त्रिभुवन हे तीन सख्खे भाऊ आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.