अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील ज्वारीच्या शेतात गवत गोळा करण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या तोंडात रुमाल कोंबून तीस जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपी शशिकांत भाऊराव गरड (२४, रा. दहेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) यास पोलिसांनी अटक केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की साईलक्ष्मीनगर परिसरातील एका १५ वर्षे वयाच्या मुलीवर आरोपी गरडने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ज्वारीच्या शेतात अत्याचार केला. आई व वडील बाहेरगावी गेलेले असल्याने घडलेला प्रकार तीने नातेवाईकांना सांगितला. 

संतप्त नातेवाईकांनी आरोपीस पकडून चोप दिला. त्यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. आरोपीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.