संगमनेर मध्ये शिवज्योतीसाठी जाताना २ मित्रांचा अपघाती मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक खंदरमाळ येथे दुचाकी आणि कंटनेरची धडक होऊन दुचाकीवरील दोन शिवभक्त मित्रांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री अकराच्या सुमारास हॉटेल बिकानेरसमोर हा अपघात झाला. संतोष मधुकर सातपुते (वय २९) आणि संतोष बबन खरे (३८) अशी मृतांची नावे आहेत.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मालदाड रस्ता परिसरातील हे दोघे युवक दुचाकीवरुन (एम. एच. १७ जे ४७७७) शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर) शिवज्योत आणण्यासाठी निघाले होते. खंदरमाळवाडी शिवारातील महामार्गाच्या कडेला असलेल्या हॉटेल बिकानेरमध्ये थांबलेला कंटेनर (आर. जे. ०१ जेबी ६३५१) मुख्य रस्त्यावर येत होता. या कंटेनरलगत उभ्या असलेल्या अन्य कंटेनरमुळे तो दुचाकीस्वारांना दिसला नाही. त्यांची दुचाकी कंटेनरला धडकली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

जवळच असलेल्या पोलिस ठाण्याला अपघाताची माहिती मिळूनदेखील रात्री उशिरापर्यत दोन्ही जखमींना मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालकाने पळ काढला. या मार्गावर गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अपघातातील हा चौथा मृत्यू आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.