अजित पवारांकडून आ.संग्राम जगतापांच्या कामाचे कौतुक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार संग्राम जगताप हे नगर शहराचे तरुण आमदार आहेत. ते विधानसभेमध्ये शहराचे विकासाचे प्रश्न मांडत असतात. ते एवढ्यापुरते न थांबता त्या विकासाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करणारा आमदार आहे. यापुढील काळात त्यांच्यामुळे नगर शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अश्या शब्दांत आ.संग्राम जगताप यांच्या विषयी बोलताना कौतुक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तरुणांना बरोबर घेऊन काम करणारा आमदार आहे. भाजप सरकारने तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. ते हवेतच विरल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

केडगाव शिवसेनेचे अजित ठुबे, रणजित ठुबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्कार केला. यावेळी आमदार दिलीप वळसे, अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, माणिक विधाते, अभिषेक कळमकर, नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, प्रा. अरविंद शिंदे, अविनाश घुले, संजय घुले, मनोज कराळे, मनोज कोतकर, राजेश भालेराव, संभाजी सातपुते, भरत गारूडकर, सागर गिऱ्हे, राहुल गिऱ्हे, चेतन कांडेकर, हर्षद पठाण, असलम सय्यद, मोईन पठाण, प्रणव भालेराव, आशुतोष उदावंत, अजय झोळ, तुषार येडगावकर, कार्तिक पिंपळे, निखिल माळी, दत्ता लहाकर, प्रमोद मोरे, फिरोज पठाण, योगेश शेवगावकर, भरत जाधव, स्वप्नील धामणे, सागर कोठुळे, अभिजित राजे, विशाल पवार, प्रवीण राऊत आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.