खा. गांधी यांच्या अतिक्रमणाची उद्या होणार मोजणी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : भाजपचे नगरचे खासदार व शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांच्या बंगल्यातील अतिक्रमणाबाबतची प्लॉट मोजणी मंगळवारी (२० फेब्रुवारी) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे यांनी खासदार गांधी यांच्यासह या प्रकरणातील तक्रारदार विनोद गांधी आणि महापालिकेच्या बुरुडगाव-केडगाव प्रभाग समितीचे प्रमुख नाना गोसावी यांना उपस्थित राहण्याचे कळवले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कोठी ते यश पॅलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी या रस्त्यातील अतिक्रमणे महापालिकेने काढली होती; मात्र, या रस्त्यावरील खा. गांधी यांच्या बंगल्याच्या कंपाउंडचे अतिक्रमण काढले गेले नाही, असा दावा तक्रारदार विनोद अमोलकचंद गांधी यांनी केला होता. त्यांनी महापालिकेकडे दाद मागितल्यानंतर संबंधित अतिक्रमणावर कारवाई झाली नसल्याचे सांगून त्यांनी नगरविकास विभागाकडेही तक्रार केली होती.

पण तेथेही दाद न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी, खासदार गांधी यांच्या बंगल्याचे कंपाउंड अतिक्रमणात आहे की नाही, हे ठरविण्यासाठी त्याचे मोजमाप करण्याचे मनपाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी (२० फेब्रुवारी) ही मोजणी केली जाणार आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार नगररचना योजना क्रमांक ३ अंतिम फायनल प्लॉट क्रमांक ६६ मधील अतिक्रमणाबाबत प्लॉटची मोजणी करण्याचे काम २० रोजी दुपारी साडेबारा वाजता सुरू करण्यात येणार असून, या वेळी या मोजणीच्या ठिकाणी पुराव्याच्या मूळ व छायांकित कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे खासदार गांधी व तक्रारदार विनोद गांधी यांना सांगण्यात आले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.