अलेक्स् फर्नांडेझ करंडक फुटबॉल स्पर्धा लॉरेन्स् एफसी, फ्रेन्डस् एफसी संघांचे संघर्षपूर्ण विजय

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवाजीयन्स् एस.सी. यांच्यावतीने आयोजित चौथ्या कै. अ‍ॅलेक्स् फर्नांडेझ करंडक 2018 स्पर्धेत गतविजेत्या लॉरेन्स् एफसी व फ्रेन्डस् एफसी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. फोर्ट (किला) मैदान, अहमदनगर क्लब लिमिटेड जवळ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात लॉरेन्स् एफसी संघाने गुलमोहर एफसी संघाचा 3-2 असा पराभव केला. 


यामध्ये लॉरेन्स् संघाच्या शशांक वाल्मिकी याने एक तर, मनिष वडाळे याने दोन गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. काल विजयी सलामी दिलेल्या गुलमोहर एफसी संघाला पराभव स्विकारावा लागला. गुलमोहरकडून शुभम काळे याने दोन गोल केले.अक्षय बोर्‍हाडे व योगेश खोलागडे यांनी नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर फ्रेन्डस् एफसी संघाने युनिटी एफसी संघाचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकालः 
गट डः सिटी क्लब पुढे चाल वि. इंडियन एफसी;
2) गट अः लॉरेन्स् एफसीः 3 (शशांक वाल्मिकी 26 मि., मनिष वडाळे 41, 42 मि.) वि.वि. गुलमोहर एफसीः 2 (शुभम काळे 19, 27 मि.);
3) गट बः फ्रेन्डस् एफसीः 2 (अक्षय बोर्‍हाडे 7 मि., योगेश खोलागडे 19 मि.) वि.वि. युनिटी एफसीः 1 (बेटाथाई 23 मि.);

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.