कोणाच्या धमकीला भीक घालत नाही जीव मुठीत घेऊनच घराबाहेर पडतो.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सकाळी घराबाहेर पडताना जीव मुठीत धरूनच घराबाहेर पडतो. दिवसभर तालुक्‍यातच असतो. विरोधकांनी तालुक्‍यात फिरून देण्याच्या दिलेल्या धमकीला भीक घालत नाही. त्यांनी कुठेही समोरासमोर यावे मी तयार आहे. काय उत्तर मागायचे ते मागा मी त्यासाठी समर्थ आहे. माझे ध्येय तालुक्‍याचा विकास हेच आहे. विकासाला खीळ घालण्याची विरोधकांनी वेगळी वाट पाडली. दहशत पसरविण्याचे सुरू असलेले काम कदापि सहन केले जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विरोधकांना दिला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नेवासा येथे नगरपंचायत अंतर्गत भुयारी बंदिस्त गटार आणि विविध विकास कामांचा आरंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी आमदार मुरकुटे बोलत होते. आ. मुरकुटे म्हणाले, गडाखांचे कार्यकर्ते गडाखांना मागे भोकडी म्हणतात, मी फक्‍त जनतेच्या मनातील भावना, त्यांची दहशत, दादागिरी, जाहीर कार्यक्रमातून जनतेसमोर मांडली. यावर त्यांनी आक्षेप घेऊन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन विकासाला खीळ घालण्याचे काम केले. यासाठी त्यांनी वेगळी वाट निवडली.

परंतु आमच्याकडून नेवासा शहराची, तालुक्‍याची शांतता भंग होणार नाही. तसे पाप आम्ही करणार नसल्याचे आ. मुरकुटे यांनी सांगितले.तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत, तसे आमच्याकडेही आहेत, परंतु आमच्याबरोबर जनता जनार्दन आहे. त्यांची ताकद, आशीर्वाद आमच्यासोबत आहे. 

खरी अमृतनगरी नेवासा आहे. या ठिकाणी भगवान विष्णूंनी अमृताचे वाटप केले होते. विरोधकांनी पंचाहत्तरीनिमित्त सोनईलाच अमृतनगरी केले. परंतु या नेवाशाला पुरातन, आधात्मिक, धार्मिक वारसा लाभलेला आहे. त्यांचा विकास करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने माझीच असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.