अकोल्यात छिंदमची अंत्ययात्रा; ग्रामस्थांनी केले मुंडन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्‍यातील कळस बुद्रुक येथे भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याची अंत्ययात्रा काढून त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या तरुणांनी व ग्रामस्थांनी छिंदम याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा अंत्यविधी काढून लगेच दशक्रियाविधी देखील उरकला. यावेळी छिंदम याचा निषेध म्हणून ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे व दौलत रभाजी वाकचौरे या ग्रामस्थांनी मुंडन करून अनोख्या पद्धतीने निषेध केला.

नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा शिवजयंती उत्सव कळस बुद्रुक येथील छत्रपती युवा प्रतिष्ठानचे तरुण साजरे करतात. मात्र शिवजयंतीला अवघे दोन दिवस बाकी असताना नगर मनपाचे भाजप पक्षाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अतिशय खालच्या पातळीचे वक्‍तव्य करून सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या. 

त्यामुळे अकोले तालुक्‍यासह संपूर्ण राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. तालुक्‍यातील सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत रास्तारोको आंदोलन केले.या घटनेचा निषेध म्हणून कोल्हार घोटी राज्यमार्गावरील सर्वात मोठे गाव असलेल्या कळस ग्रामस्थांनी देखील गाव बंदची हाक दिली व गावात कडकडीत बंद पाळला. 

ग्रामस्थांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाली नऊ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी कोल्हार घोटी राज्य मार्गावर एकत्र जमून गावातून निषेध फेरी काढली. यावेळी छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या तरुणांनी श्रीपाद छिंदम याच्या निषेधाच्या तीव्र शब्दांत घोषणा दिल्या. 

सकल मराठा समाजाचे व बहुजन समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक वक्‍तव्य काढणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्याविषयी नागरिकांच्या भावना अधिकच तीव्र झालेल्या यावेळी पाहायला मिळाल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.