श्रीपाद छिंदमच्या नावाचीच ॲलर्जी ! पोस्टर, दिनदर्शिका फाडल्या, तर बाकड्यांची तोडफोड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या नावाची देखील ॲलर्जी होऊ लागली आहे. महापालिका कार्यालयाच्या आवारात त्यांचे नाव असलेले पोस्टर एका शिवसैनिकांनी फाटले, तर शहरातील काही भागात त्यांची नावे असलेले बाकडे देखील स्थानिक नागरिकांनी दगडं घालून तोडून टाकली. त्याचप्रमाणे त्यांचे नाव असलेल्या दिनदर्शिका देखील फाडून फेकून देण्यात आल्या.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप शुक्रवारी व्हायरल झाली होती. त्याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही नगर शहरासह जिल्ह्यात उमटले. महापालिकेच्या कार्यालयात शासकीय योजनांचे फलक लावले होते. त्यावर महापौर आणि उपमहापौर यांचे नाव होते. मात्र उपमहापौर यांचे नाव असलेली बाजू काही शिवसैनिकांनी फाडून टाकली. त्यामुळे काही काळ महापालिकेतील वातावरण तापले होते. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर प्रकरण शांत झाले.

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पदाधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराला आजही कुलूप कायम ठेवले. हा प्रकार शांत होत नाही तोच उपमहापौर यांच्या स्थानिक निधीतून बसविण्यात आलेल्या बाकड्यांची देखील तोडफोड करण्यात आली. स्थानिक नागरिकांच हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे शहरातील काही भागात तणाव होता.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या योजना सांगणारे आणि स्वत:चे छायाचित्र असलेले उपमहापौर छिंदम यांच्या दिनदर्शिका देखील काही ठिकाणी फाडून टाकण्यात आल्या. या दिनदर्शिकांचे वाटप काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, संस्था, दुकानांमध्ये या दिनदर्शिका वाटण्यात आल्या होत्या. शाळेतील दिनदर्शिक विद्यार्थ्यांनीच फाडल्या. त्यानंतर त्यावर नाचले देखील. काहींनी या दिनदर्शिक काढून फेकून दिल्या, तर काही परस्पर विल्हेवाट लावल्याची चर्चा होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.