राष्ट्रवादीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जुने बसस्थानक येथील त्यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर यावेळी निघालेल्या मिरवणुकित राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, संजय झिंजे, उबेद शेख, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, ज्ञानदेव पांडुळे, नगरसेवक विपुल शेटीया, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, ओबीसी विभागाचे अमित खामकर, दतात्रय राऊत, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला आघाडीच्या रेशमा आठरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, वकिल सेलचे अ‍ॅड.योगेश नेमाणे, सेवादलाचे हनिफ जरीवाला, युवती शहर जिल्हाध्यक्षा अंजली आव्हाड, प्रा.अरविंद शिंदे, बाळासाहेब पवार, फारुक रंगरेज, रेखा जरे, प्रकाश भागानगरे, वैभव शिंदे, राजश्री मांढरे, निलेश इंगळे, साधना बोरुडे, लकी खुपचंदानी, कोमल औसरकर, अंकुश मोहिते आदि उपस्थित होते. 

आ.संग्राम जगताप म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजा पर्यंन्त पोहचिण्याकरिता राष्ट्रवादीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा तर युवकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्दीसाठी शिवाजी महाराजांचा वेगळा इतिहास काही माथेफिरु मांडत असल्याने समाजात दुफळी निर्माण होत आहे. सामाजिक एकतेसाठी महाराजांचा खरा इतिहास घराघरात पोहचविण्याची गरज असल्याची भावना व्यक्त करीत, जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकितून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरचे दर्शन घडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.