श्रीपाद छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशव्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचे दिल्लीगेट जवळील कार्यालय रविवारी (दि.१८) दुपारी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला आहे. छिंदम याने केलेल्या वक्तव्याचा निषेध तिसऱ्या दिवशीही कायम असून याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, छिंदम याला अटक करून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून शनिवारी (दि.१६) रात्री त्याला कारागृह प्रशासनाने त्याच्या जीवितास धोका असल्याने नाशिक कारागृहात हलविले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप शुक्रवारी (दि.१६) व्हायरल झाल्यामुळे विविध पक्ष, संघटना व शिवप्रेमी रस्त्यावर उतरत असून आपला निषेध नोंदवत आहेत. रविवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी छिंदमचे दिल्लीगेट येथील कार्यालय पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळाजवळच पोलिस असल्याने तातडीने त्यांनी ही आग विझवली.

छिंदमने मनपा कर्मचारी बिडवे यांना फोनवर बोलताना शिवजयंती व शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ही क्लिप राज्यभर पसरल्यामुळे याचे गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या बाबीची तातडीने दखल घेत भाजपच्यावतीने छिंदमचे पक्षातून निलंबन करण्यात आले. त्याला अटक करून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला कारागृहात नेले असता कैद्यांनीही शिव्यांची लाखोली वाहत घोषणाबाजी करत त्याचा निषेध केला. यावेळी त्याला मारहाण केल्याचीही चर्चा आहे. 

त्याच्या जिवीतास धोका असल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने त्याला जिल्ह्याबाहेरील कारागृहात हलविले. मात्र तरीही शिवप्रेमींच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पालकमंत्री ना.राम शिंदे, खा. दिलीप गांधी यांच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली आहे. तसेच विविध पक्ष, संघटना, शिवप्रेमी राज्यभर त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहेत. कार्यालय जाळण्याच्या प्रयत्नामुळे त्याच्या घराभोवतीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.