भाळवणी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीत होणार उलथा-पालथ, सुजित झावरे यांना आणखी एक धक्का बसणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गटातील संघर्ष जगजाहीर असताना पुन्हा एक धक्का राष्ट्रवादीला बसणार आहे. ढवळपुरी गटात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून राजकीय ‘श्रीगणेशा’ केलेले पंचायत समिती सदस्या सुनंदा सुरेश धुरपते हे समर्थकांच्या मागणीवरून राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडून सेनेशी जवळीक साधण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सुजित झावरे यांना हा मोठा धक्का असणार आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुजित झावरे-अशोक सावंत, दिपक पवार असे दोन गट निर्माण झाले. यामध्ये सुपा, निघोज, टाकळी ढोकेश्‍वर, अळकुटी पाठोपाठ आता भाळवणी गणातही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. गणातील गावांमध्ये पंचायत समिती निवडणुकीत दिलेले आश्वासने सदस्या धुरपते यांनी पाळल्याने त्यांनी गणात वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र राष्ट्रवादी कॉंगेसकडून वेळोवेळी धुरपते यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादीबाबत नाराजीचे वातावरण आहे.

दोन महिन्यांपूर्वी पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती उद्योजक सुरेश धुरपते यांच्यावर ३९० कोटी गैरव्यवहारप्रकरणी महसुलची कारवाई झाल्यानंतर भाळवणी गणातील एक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियातून धुरपते यांची बदनामी केली. तरीदेखील सुजित झावरे यांनी मध्यस्थी केली नाही. 

या नाराजीतून धुरपते यांच्या भाळवणी गणातील गावांमधील समर्थकांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची आर्त हाक धुरपते यांना घातली असल्याची माहिती मिळाली आहे. नुकताच धुरपते यांना जामीन मिळाल्याने कार्यकर्त्यांचे गट धुरपते यांना भेटण्यासाठी मुंंबईत दाखल होत आहे. कार्यकर्त्यांची नाराजी व इच्छेनुसार पंचायत समिती सदस्या धुरपते लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याचे खात्रीदायक समजते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.