...कधीकाळी ह्याच राजकीय नेत्यांनी छिंदमवरचे प्रेम भरभरून व्यक्त केले होते !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या छिंदमवर सर्वच राजकीय पक्षांकडून व नेत्यांकडून टीकेचा भडीमार होत आहे. पण कधीकाळी यापैकी बहुतांश राजकीय नेत्यांनी श्रीकांत व श्रीपाद या छिंदम बंधूंवरचे प्रेम भरभरून व्यक्त केले होते. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरला महापालिका झाल्यानंतर केडगाव महापालिका हद्दीत समाविष्ट झाले. या वेळी शहर काँग्रेस भानुदास कोतकरांच्या ताब्यात होती. त्यांना नगरच्या व विशेषतः शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तोफखाना परिसरात पाय रोवण्यासाठी श्रीकांत छिंदमची मदत झाली. त्या वेळी युथ काँग्रेसचा तो प्रमुख होता. २००३ च्या मनपा निवडणुकीत मात्र तो पराभूत झाला. 

त्यानंतर २००८ मध्ये शिवसेनेकडून त्याने महापालिका लढवली. या वेळी सेनेचे तत्कालीन आमदार अनिल राठोड यांनी त्याचा प्रचार केला. पण याही निवडणुकीत तो पराभूत झाल्याने अवघ्या दोन महिन्यांत स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतला व स्वीकृत नगरसेवकही झाला. 

पुढे खूनप्रकरणी कोतकर कारागृहात गेल्याने छिंदम बंधूंनी २०१३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळच्या महापालिका निवडणुकीत भाजप तिकीट वाटपाची जबाबदारी आमदार शिवाजी कर्डिले, अॅड. अभय आगरकर व खासदार दिलीप गांधींवर होती. त्यांनी श्रीपादला तिकीट दिल्यानंतर तो तोफखान्यातून निवडून आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अडीच वर्षांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या गांधी गटात तणाव होऊन आमने-सामने लढाईची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप यांनी छिंदमला पाठिंबा दिला. त्यामुळे उपमहापौर झाल्यावर छिंदमने लगेच जगतापांकडे धाव घेऊन त्यांचे दर्शन घेतले. 

तरीही तोफखान्यातील सेनाविरोधाच्या राजकारणात उपयोगी ठरण्याच्या उद्देशाने गांधींकडूनही छिंदमला बरीच ताकद दिली गेली. दिल्लीगेटजवळील फॅब्रिकेशन व्यवसायापासून बांधकाम व्यवसायापर्यंतच्या छिंदम बंधूंच्या प्रवासात राजकीय वाटचालीत नगरच्या सर्वच दिग्गज राजकीय नेत्यांनी व पक्षांनी त्यांना दिलेल्या पाठबळाची चर्चा राजकीय विश्वात आहे. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.