श्रीपाद छिंदमचे प्रदेश भाजपमधील अस्तित्व अजूनही कायम !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारल्यानंतर नगर भाजपमधून बडतर्फ करण्यात आलेला उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे प्रदेश भाजपमधील अस्तित्व अजूनही कायम आहे. प्रदेश भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीच्या संघटन सरचिटणीसपदी चार महिन्यांपूर्वी छिंदमची नियुक्ती झालेली आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गर भाजपने त्याची हकालपट्टी केली असली तरी दक्षिण भारतीय आघाडीने मात्र अद्याप बडतर्फी वा अन्य कारवाई केलेली नाही. दरम्यान, छिंदमवर नगरमधील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आतापर्यंत दाखवलेल्या प्रेमाची व आता त्यांच्याकडूनच त्याच्यावर होत असलेल्या टीकेची जोरदार चर्चा शहरात आहे

महाराष्ट्रात राहात असलेल्या दक्षिण भारतीय नागरिकांचे संघटन करताना त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रदेश भाजपने दक्षिण भारत आघाडी सुरू केली आहे. मागील नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबईत झालेल्या कार्यक्रमात छिंदमची या आघाडीच्या प्रदेश संघटन सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्याला नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. या वेळी नगरचे भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी उपस्थित होते. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या शिफारशीवरून छिंदमची नियुक्ती झाली होती. 

छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारल्याने शहर जिल्हा भाजपने छिंदमला बडतर्फ केले आहे व त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेऊन तो महापौरांकडे पाठवला आहे; मात्र, त्याच्या प्रदेश दक्षिण भारतीय आघाडीच्या संघटन सरचिटणीसपदाची नियुक्ती अद्याप कायम आहे व तेथील बडतर्फी मात्र अजून प्रतीक्षेत आहे. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.