झेंडे घेऊन फिरणारांना शिवाजी महाराज, डॉ.आंबेडकर समजले का - निखिल वागळे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशात राज्य घटनेची पायमल्ली करणारे आणि धर्मांध विचारांचे सरकार सत्तेत आहे. हिंदुत्वाच्या नावावर देश चालविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याला कॉंग्रेसचे नाकर्ते सरकार कारणीभूत ठरले. यामुळे देशाच्या अखंडता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण झाल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेरमध्ये प्रा. जी. व्ही. रुपवते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यान प्रसंगी वागळे बोलत होते. यावेळी पत्रकार प्रतिमा जोशी यांचा सन्मान करण्यात आला. आमदार डॉ. सुधीर तांबे, बहुजन शिक्षण संघाचे विश्‍वस्त प्रेमानंद रुपवते यावेळी उपस्थित होते.

वागळे म्हणाले, भीमा कोरेगावची घटना म्हणजे शांततावादी समुदायावर धर्मांध जातीयवाद्यांच्या एका विशिष्ट समुदायाने केलाला पूर्वनियोजित हल्ला होता. त्याचे प्रतीक म्हणून मनोहर भिडे, मिलींद एकबोटे समाजासमोर होते. ही घटना घडेपर्यत पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनादेखील अनेक गोष्टी माहिती नव्हत्या. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सुधारणावाद्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात खून पडत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराजांच्या विचारांना पहिला छेद देण्याचे काम कॉंग्रेसने सत्तर वर्षापूर्वी केले. हे ढोंगीपणाने वागले म्हणून या जातीयवादी शक्‍ती सत्तेत आल्याचा आरोप वागळे यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंचे नाव फक्‍त राजकारणासाठी वापरले जाते. महात्मा फुलेंना एका जातीत बंद केले आणि त्यांच्या नावाने पैसे कमावणारे जेलमध्येसुद्धा गेले. भीमा कोरेगावनंतर डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणारे मंत्रीसुद्धा खुर्चीला चिकटून बसलेत. महाराष्ट्रात समता फक्‍त शब्दात आहे. 

ब्राम्हणी प्रवृत्ती सर्व जातीधर्मात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्योत्तर काळानंतरचा नेता म्हणून जाहीर केल्यावर माझ्यावर सोशल मीडियातून प्रचंड टीका झाली. आज राष्ट्रपुरुषांचे श्रेष्ठत्व आम्ही जातीपातीत बांधत आहोत. झेंडे घेऊन मोटारसायकलवरुन फिरणाऱ्या बहुसंख्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकरांचे चरित्र वाचलेले नाही, असे वागळे यांनी सांगितले.

कोरगावभीमाची बातमी दडविली…
आज बहुसंख्य माध्यम विकली गेलीत. पूर्वी पत्रकार विकले जात आता मालक विकले जाऊ लागलेत. त्यामुळे सकाळी घडलेली कोरेगावभीमाची बातमी रात्री उशिरापर्यत दडविण्यात पत्रकारांचा दोष नाही. बातमी दिल्यावर दंगल होईल म्हणून मीडियाने त्या दिवशी त्यांचे काम केले नाही, ते शरद पवारांनी केले. हिंदुत्त्ववादी धर्मांध यामागे असल्याचे त्यांचे विधान सुदैवाने खरे ठरले. पोलीस, सरकार असे लोकशाहीचे सर्वच खांब ज्यावेळी आपले कर्तव्य विसरतात. त्यावेळी समाजात अनाचार माजण्यास मदत होईल, असे वागळे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.