साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांबाबत नाराजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी शनिवारी आपल्या जवळच्या रुग्णाची साईबाबा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी न केल्याने काही रुग्णांनी नाराजी व्यक्‍त केली.मागील काही दिवसांपासून साईबाबा रुग्णालयात येणा-या रुग्णांवर चांगल्या पध्दतीने उपचार करण्यात येत नसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. त्याबाबत शिर्डीत चर्चाही आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रुग्णालयाकडे संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाने लक्ष द्यावे, अशी रुग्णांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. परंतु, रुग्णालयाकडे कोणीही पदाधिकारी ढुंकून पाहत नाही, अशीही चर्चा होत आहे. रुग्णालयात अस्वच्छता असल्याने मोठी दुर्गंधी पसरलेली असते.

रुग्णांना काही कर्मचा-यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक कर्मचारी मोबाइलवर बोलण्यात तसेच टोळके करून गप्पा मारण्यात दंग असतात, रुग्णवाहिकांची दुरवस्था झाल्याने रुग्णांना खासगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेऊन जाव्या लागतात, कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही, चॅरिटी विभागात असलेल्या कर्मचा-यांकडून उध्दट भाषा वापरली जाते, या ठिकाणी नेमणूक असलेले कर्मचारी वेळेचे बंधन पाळत नाही, अशी अवस्था या रुग्णालयाची झाल्याच्या चर्चेला शहरात उधाण आले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शनिवारी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे रुग्णालयात आले असता रुग्णालयातील सर्व कर्मचारी व सर्व यंत्रणा अलर्ट राहणे गरजेचे होते. परंतु, अध्यक्ष आले असतानाही बरेच कर्मचारी नेहमीप्रमाणे वैयक्‍तिक गोष्टीतच मग्न असल्याचे दिसले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.