शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केल्याशिवाय ठाकरे शांत बसणार नाहीत…

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा झाल्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे शांत बसणार नाहीत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, कामगारांचे राज्य आणण्यासाठी शिवसेना हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी राहुरी विधानसभा मतदार संघावर भगवा फडकवून शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहुरी तालुक्‍यातील कानडगाव येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोपानराव गागरे, तर व्यासपीठावर शिवसेना उपनेते अनिल राठोड, खा. सदाशिव लोखंडे, घनश्‍याम शेलार, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, गोविंद मोकाटे, डॉ. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मा. आ. राठोड म्हणाले, शिवसेना सदैव शेतकऱ्यांसोबत असल्याने लोकांचा शिवसेनेवर विश्‍वास आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, बियाणे, पाणी, इत्यादी आवश्‍यक बाबी पुरवणे हे सेनेचे ध्येय आहे. इतर पक्षांप्रमाणे निवडणुका जवळ आल्यावर सेना लोकांमध्ये जात नाही तर ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज असेल त्यावेळी शिवसेना रस्त्यावर उतरून साथ देते, असे आवर्जून सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
खा. सदाशिव लोखंडे यांनी निळवंडेच्या प्रश्‍नाला हात घालून मुंबई येथे खेवरेंसोबत केलेले उपोषण, जलदिंडी, आदींची माहिती देऊन शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर या प्रश्‍नाला चालना मिळाल्याचे सांगितले. तसेच दोन वर्षे द्या, या भागातील सर्वच गावांना निळवंडेचे पाणी आणून दाखवू, असाही विश्‍वास व्यक्‍त केला.

याप्रसंगी खेवरे म्हणाले, आतापर्यंत राहुरी तालुक्‍याला विखे, तनपुरे व कर्डिलेंनी फसविले आहे. 40 वर्षांपासून या भागातील गावांना निळवंडेचे पाणी देण्याचे आश्‍वासन देऊन अनेकांनी राजकीय पोळी भाजली आहे. मात्र, यावेळी आपल्याला संधी दिल्यास निश्‍चितच हा प्रश्‍न तडीस नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.