छिंदमला चाबकाचे फटके मारले पाहिजेत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पंतप्रधान नरेंद्र मोदीच जर देशात थापा मारत असतील तर भाजपच्या उपमहापौराकडून वेगळी अपेक्षा काय करावी? असा प्रश्‍न करत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी यांनी श्रीपाद छिंदमसारख्या प्रवृत्तीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चाबकाचे फटके मारले पाहिजेत असे वक्‍तव्य केले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवसेनेच्या वतीने शहरातील महावीर मंगल कार्यालयात शिवसेना पदाधिकारी मेळावा शुक्रवारी झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्‍याम शेलार, डॉ. विजय पाटील, तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक सुनीता हिरडे, प्रशांत बुध्दीवंत, कर्जतचे तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड, पाथर्डीचे तालुकाप्रमुख रफीक शेख, अंकुश उगले, काकासाहेब काशीद, लक्ष्मण कानडे, अमृत लिंगडे, गणेश क्षीरसागर, हिंदुराज मुळे, संजय शेलार, मोहन जाधव, काशिबाई म्हेत्रे, राजेंद्र वारे उपस्थित होते.

घाडी म्हणाले, भाजप सरकार फसवे आहे. या सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे. भाजप सरकार म्हणजे भारतीय राजकारणाला लागलेली कीड आहे,” अशीही टीका त्यांनी केली. शिवाजी गाडे म्हणाले, “”जेथे राष्ट्रवादीचा साखर कारखाना आहे तेथेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले आहे. कारण, हल्लाबोल आंदोलनाला लोक जमवण्यासाठी कारखान्याचा वापर झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
घनश्‍याम शेलार म्हणाले, राष्ट्रवादीत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जामखेडच्या जनतेला कुकडीचे पाणी देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळताना आम्ही चौंडीपर्यंत कुकडीचे पाणी पोहोच केले. मात्र, याचे श्रेय राम शिंदे घेत आहेत. राम शिंदे नशिबाने पालकमंत्री झाले आहेत. त्यांनी कर्जत, जामखेडची निराशा केली आहे. देशात नरेंद्र मोदींसह भाजपने जनतेला फसवण्याचे काम केले आहे. आज जी काही कर्जमाफी मिळाली आहे ती फक्‍त शिवसेनेच्या आग्रहाखातर झाली आहे.” सूत्रसंचालन नीलेश दिवटे यांनी केले. सुभाष जाधव यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.