सराफ व्यावसायिकांवर पाळत ठेवून दागिने लुटणारी गुन्हेगारांची टोळी गजाआड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : सराफ व्यावसायिकांवर पाळत ठेवून दागिने लुटणारी सराईत चार गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली. शिरूर-बेलवंडी रस्त्यावरील राजापूर फाट्याजवळ एका सराफाला अडवून त्याच्याकडील तब्बल ११ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना ३० जानेवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून अारोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिरूर येथील सराफ पंकज किशोर डहाळे हे ३० जानेवारीला सायंकाळी त्यांचे देवदैठण (ता. श्रीगोंदे) येथील सोन्याचांदीचे दुकान बंद करून दुचाकीवरून शिरूरकडे निघाले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिरूर-बेलवंडी रस्त्यावरील राजापूर फाट्याजवळ पाठीमागून दोन मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी डहाळे यांच्या दुचाकीस धक्का देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, तसे लाडी दांडक्याने मारहाण करत त्यांच्याकडील ११ लाख ७५ हजार रुपयचे दागिने घेऊन त्यांनी पोबारा केला. याप्रकरणी डहाळे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. सदर गुन्हा आरोपी बाळू पांडुरंग घोडके (घाेसपुरी, ता. नगर) याने व त्याच्या सहकाऱ्यांनी केला असल्याची गोपनीय माहिती पवार यांना मिळाली. आरोप १५ फेब्रुवारीला सकाळी नगरमधील इम्पिरिअल चौकात येणार असल्याची माहिती पवार यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी घाेडके याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेत सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने आरोपी किरण गोवर्धन निकम, अविनाश बाळासाहेब आरवे व अक्षय त्रिंबक घोडके (तिघे घोसपुरी, ता. नगर) यांच्यासह हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या आरोपींना नगर तालुका पोलिस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आलेली होती. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ९ हजार रुपये िकमतीचे ५०० ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचे ७८ ग्रॅम, ८० मि. ग्रम सोन्याचे दागिने व ९३ हजारांचे २.६७८ कि. ग्रॅम, ८१० मि. ग्रॅम असा एकूण ३ लाख २१ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक राजेंद्र पडवळ करत आहेत. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, कर्जतचे उपविभागय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.