श्रीरामपूर तालुक्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगावला येथील अनिता जालिंदर आसने (वय १९) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विवाहितेच्या माहेरकडील मंडळीकडून रात्रीउशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी : गुळज (ता. गेवराई, जि. बीड) येथील गोरक्षनाथ भास्कर ढोकणे यांची कन्या अनिता हिचा विवाह १२ डिसेंबर २०१७ रोजी माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील जालिंदर शिवाजी आसने याच्याबरोबर गुळज येथे झाला होता. दरम्यान, शनिवारी (दि.१७) तिने माळवाडगाव येथे दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेनंतर माहेरची मंडळी आल्याशिवाय पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले नव्हते. माहेरची मंडळी आल्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळींना अटक झाल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरूद्ध रात्री उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम सुरू होते. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. दरम्यान, मुलीने गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. मात्र, त्यातील मजकूर समजू शकला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.