अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण,आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : कोपरगाव शहरातील महादेवनगर भागातील अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार करणा‍ऱ्या आरोपी आकाश दिपक पाठक यास शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महादेवनगर भागातील अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन १२ फेब्रुवारी दुपारी २ वाजता व दि.१४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता आरोपी पाठक याने तिला फुस लावुन, धाक दाखवून व पैशाचे अमिष दाखवुन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी आरोपी पाठक याच्या विरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आरोपीस जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास थोरात हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.