किरकोळ कारणावरून श्रीरामपुरच्‍या तरूणाचा कोपरगावात खुन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : लग्‍नाला जात असताना कोपरगाव येथे साई तपोभुमी चौकात उभा असताना मोटारसायकलचा धक्‍का लागल्‍याने शिवीगाळ केल्याचा राग आल्‍याने अज्ञात मोटारसायकल स्‍वाराकडून बेदम मारहाण झाल्‍याने श्रीरामपुर येथील अकबर रज्‍जाक तांबोळी (वय ३८ ) याचा मृत्‍यू झाला. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबात सविस्तर असे की, श्रीरामपुरच्‍या अमानत नागरी पतसंस्थेत कलेक्‍शन प्रतिनिधी म्‍हणुन काम करणारे मयत अकबर रज्‍जाक तांबोळी हे शनिवारी धुळ्याला लग्‍नाला जाण्यासाठी श्रीरामुपर येथून निघाले असता त्‍यांना कोपरगावपयंर्त गाडी मिळाली होती. ते साई तपोभुमी चौकात दुपारी ४.३० वाजेच्‍या सुमारास उतरले. व धुळ्याला जाणाऱ्या गाडीची वाट पाहत उभे असताना अज्ञात मोटारसायकलचा त्यांना धक्‍का लागला.

त्‍यांनी त्यास शिवीगाळ केली. याचा राग येऊन मोटारसायकलस्‍वारांनी त्‍याला बेदम मारले व सोडून दिले. त्‍यानंतर अकबर हा नगर-मनमाड महामार्गाने शितल हॉटेलपयंर्त गेला. वेदना व त्रास होत असल्‍याने त्‍याने श्रीरामुपरला घरच्‍यांना फोन केला. तिथेच त्‍याचा मृत्‍यू झाला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शहर पोलीसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्‍थळी पोहचले. पोलीस उपअधिक्षक सागर पाटील व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे पुढील तपास करीत आहेत. दरम्‍यात मयत अकबर याच्‍या घरचे कोपरगाव येथे आले होते. तर मयत अकबर याचे शव शवविच्‍छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्‍णालयात हलविण्यात आले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.