श्रीगोंद्यात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे शनिवार दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेताच्या बांधावर त्याच गावातील रहिवासी असणारे अण्णा रोहिदास काळे (वय ५३ वर्षे) यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळे यांची हत्या की आत्महत्या याबाबत श्रीगोंदा पोलीस तपास करत आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की लिंपणगाव येथील नितीन बबन वाघमारे यांनी गावातीलच अनिल नानासाहेब रोडे यांची जमीन वाट्याने केली आहे. शप्निवार दि.१७ रोजी दुपारी साडेबारा वाजता वाघमारे हे त्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेले असत. शेताच्या बांधाला एका पुरुषाचे प्रेत दिसले. याबाबत त्यांनी शेतमालक व गावकऱ्यांना माहिती दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याठिकाणी आलेल्या एका महिलेने हे प्रेत आपले वडील अण्णा रोहिदास काळे यांचे असल्याचे सांगितले. परंतु काळे यांची हत्या की आत्महत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. नितीन बबन वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.