छिंदमचे विधान भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अपशब्द बोलणाऱ्या नगरचे उपमहापौर छिंदम यांचे विधान भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण असुन पक्षाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी मंत्रालयात जाळ्या बसविण्या ऐवजी सरकारने शेतमालाला योग्य दाम आणि बेरोजगारांच्या हाताला काम दिले पाहीजे अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ना. अशोक चव्हाण यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, रणजीत देशमुख, आ.भाऊसाहेब कांबळे, अशोक खांबेकर उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना ना. चव्हाण यांनी सांगितले की, मंत्रालयात दिवसेदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढत असून राज्यातील परीस्थिती अतिशय स्पोटक होत चालली आहे. 

मराठवाड्यासह विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांची अवस्था कर्जमाफी संदर्भात असो अथवा मालाला आधारभूत किंमत तसेच बोंड अळीच्या बाबतीत असो शासनाकडून मिळणाऱ्या सुविधेत या सरकारने दिरंगाई केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वारंवार सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर विषय लावून धरला आहे. विषय जरी क्लिष्ट असला तरी कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. दुदैर्वाने याला राजकीय रंग देण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत आहे. निरव मोदीच्या बारा हजार कोटी घोटाळ्या बद्दल ते म्हणाले, एवढी मोठी रक्कम एखादा व्यक्ती बँकेला लुबाडून परदेशात जातो, आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही म्हणजे शेतकरी हा कर्जमाफीसाठी वणवण करीत आहे. 

आत्महत्या करीत आहे त्यांच्या बद्दल कधी विचार होत नाही.निरव मोदी, विजया मल्ल्या ,ललित मोदी यांच्या कर्जाची आकडेवारी केली तर करोडोच्या पुढे जाईल. त्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जाते.तेच पैसे शेतकऱ्याला दिले तर लोकांना काही वाटणार नाही. नुसत्या घोषणाबाजी चालू आहे. सरकारचा दृष्टीकोन एका विशिष्ट वगार्लाच मदत करण्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.