अशोक बिडवे - शिवरायांचा सच्चा मावळा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापालिकेच्या बांधकाम विभागातील मुकादम अशोक बिडवे यांच्यामुळे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याला तोंड फुटले. महापालिकेत प्रशासन विरूद्ध पदाधिकारी हा नेहमीच संघर्ष असतो. तो या घटनेनंतर देखील राहणार आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील 'तू-तू, मैं-मैं' हे प्रसंग यापूर्वीही घडले आहेत.परंतु अशा प्रसंगावर बऱ्याचदा प्रशासनाकडून मौनच पाळले जाते. कारण, दगडाखाली हात! 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मात्र मुकदाम अशोक बिडवे याला अपवाद ठरले. उपमहापौर छिंदम यांनी त्यांच्याशी केलेल्या चुकीच्या वक्तव्याविरूद्ध त्यांनी आवाज उठविला. हा आवाज म्हणजे, अशोक बिडवे यांनी पाळलेला शिवधर्मच, असे म्हटले तरी वागवे ठरू नये.

अशोक बिडवे हे बांधकाम विभागात मुकादम म्हणून कार्यरत आहेत. जुन्या महापालिकेत येऊन ते कामाचे नियोजन करतात. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ते नेहमीप्रमाणे कामाच्या नियोजनात होते. कर्मचाऱ्यांना काम ठरवून देत होते. झालेल्या कामांचा आढावा घेत होते. न झालेल्या कामांवरून कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढत होते. तेवढ्यात उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून काही कामानिमित्त दोन कर्मचारी पाठवून देण्याची मागणी केली. 

बिडवे यांनी कर्मचारी कमी असल्याचे सांगितले. हे सांगण्यापूर्वी काम काय आहे त्याची विचारणा केली. परंतु उपमहापौर छिंदम ते सांगायला तयार नव्हते. यावर देखील बिडवे यांनी उपमहापौर छिंदम यांची समजूत घालत कमी कर्मचारी असल्याचे सांगितले. शिवजयंतीनंतर कर्मचारी येत जातील, असे सांगण्याचा प्रयत्न केला. छिंदम यांनी मात्र बिडवे यांचे काहीही ऐकून न घेता अकलेचा तारे तोडले. छिंदम यांच्या या भूमिकेनंतरही बिडवे यांनी दोन कर्मचारी पाठवून दिले.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
छिंदम यांनी यावर शांत न बसता अभियंता विलास सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला. मुकादम अशोक बिडवे हे सांगितलेले काम करत नाहीतस, अशी तक्रार केली. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी तोंडी मागणी केली. सोनटक्के यांनी छिंदम यांची समजूत घातली. यावर छिंदम यांनी आपण लेखी तक्रार करतो, असे सोनटक्के यांना सुनावले. 

सोनटक्के यांनीही आपले लेखी पत्र आल्यावर पुढील कार्यवाही होईल, असे सांगत मोबाईल बंद केला. सोनटक्के यांनी यावर बिडवे यांच्याशी संपर्क साधला. बिडवे यांनी छिंदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा तपशील सोनटक्के यांना सांगितले. सोनटक्के यांनीही छिंदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती बिडवे यांना दिली.

बिडवे यांनी यावर महापालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे आणि आनंद वायकर यांच्याशी संपर्क साधला. छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचा तपशील ऐकविला आणि सोनटक्के यांच्याकडे निलंबन करा, अशी केलेल्या मागणीची देखील माहिती दिली. छिंदम यांच्या वक्तव्याची क्लीप युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकल्यानंतर त्याची माहिती महापालिका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे यांना देण्यात आली. यानंतर ही क्लीप वेगाने व्हायरल झाली आणि त्याचे संपूर्ण पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले.

अशोक बिडवे यांच्या पाठीशी.
सत्तेत असलेले उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्य समाजासमोर आणणारे अशोक बिडवे यांच्या पाठिशी महापालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी असल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे मराठा सेवा संघ अध्यक्ष सुरेश इथापे यांनी दिली. लोकप्रतिनिधी अनेकादा दबाव आणून काम करून घेतात. त्याला पायबंद बसला पाहिजे. अशोक बिडवे यांचे धाडस कौतुकास्पद आहे. अशा अपप्रवृत्तींविरोधात काम करत राहू, असेही ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.