आरोग्य शिबीरे ही जनतेची सेवा करण्याची संधी देणारे व्यासपीठ - सुजय विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिवसें-दिवस महागाईचा भस्मासूर वाढत चालला असतानाच तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. मात्र अशा या परिस्थितीजन्य काळात आरोग्य शिबीर भरवून त्यामध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून औषध उपचाराची सेवा देणे म्हणजे मोठे योगदानच आहे. असे मत डॉ.सुजय विखे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे जनसेवा फौंडेशन, विठ्ठलराव विखे फौंडेशन व डॉ.विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.विखे बोलत होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, सदस्या संगीताताई दुसंगे, माजी सदस्य नितीनराव काकडे, प्रकाश भोसले, सरपंच सुभाष पवळे, माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे, आस्मानराव घोरतळे, प्रतिक खेडकर, राम केसभट, शेवगावचे नगरसेवक सागर फडके, ज्ञानेश्वरचे संचालक मोहनराव देशमुख, माजी संचालक चंद्रकांत गरड, डॉ. अरुण गोरे, रामनाथ राजपुरे, प्रभाकर हुंडेकरी, गणेश निकम, राम अंधारे आदीसह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. 

यावेळी डॉ.सुजय विखे म्हणाले की, शिबीर होण्यामागचा कुठलाही राजकीय हेतू नसून आज घेण्यात आलेल्या या शिबिराचा राजकीय तर्क-वितर्क निश्चित होणार असून, कुणी काहीही म्हटले तरीही या माध्यमातून रुग्णांची सेवा होण्यास मदत होणार आहे. कारण मी डॉक्टर ही पदवी मिळवली असून. या व्यवसायाशी निगडीत असणारे आरोग्य तपासणी शिबीर नागरिकांना आपल्या आरोग्यास फलदायी ठरणारे असून. जनतेची सेवा करण्याची संधी देणारे हे एक व्यासपीठ आहे. 
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
या वेळी राजाश्रीताई घुले, नितीनराव काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आहे. सुत्रसंचालन शिवाजी समिंदर यांनी तर आभार प्रमोद नरवडे यांनी मानले. या शिबिरात सुमारे १ हजार ९३४ रुग्णांची तपासणी केली. ३५१ रुग्णांना पुढील उपचारासाठी विखे फौंडेशन रुग्णालयाच्या विळद घाटात रवाना करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.