राष्ट्रवादीच्या 'हल्लाबोल'मध्ये पाकिटमाऱ्यांच्या हस्तकलेचे दर्शन !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी शेवगावला यात्रेचे स्वरूप आले होते. झालेल्या गर्दीची पर्वणी साधत यावेळी अनेकांनी आपल्या हस्तकलेचे नैपुण्य दाखवत अनेकांचे खिसे साफ केले. काही सतर्क नागरिक व पोलिसांनी यातील काही कलाकारांना रंगेहाथ पकडले. मात्र, ते जामखेडच्या एका नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याने राजकीय दबावामुळे या पाहुण्यांना पोलीस ठाण्यात आणून लगेच सोडून देण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
चर्चा नको म्हणून एका जणावर थातूरमातूर कारवाई झाली. ही चर्चा सध्या शेवगावात चांगली रंगली आहे.
गर्दी मग ती कोणत्याही कारणाने होवो त्यामध्ये हवसे-नवसे असतातच. अशा ठिकाणी अनायासे आपले हस्तकौशल्य दाखवण्याची संधी मिळत असते. हल्लाबोलच्या निमित्ताने तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोठी गर्दी उसळली होती. ही पर्वणी साधण्यासाठी अनेक ठिकाणचे पाकीटमार येथे आले होते. 

त्यातील अनेकांनी आपली हातचलाखी दाखवली. या आंदोलनास राष्ट्रवादीचे राज्यातील दिग्गज नेते आले होते. पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या तालुक्‍यातच हल्लाबोलचे आयोजन असल्याने नियोजनपूर्वक मोठी गर्दी झाली होती. यावेळी वक्‍त्यांनी राज्यातील जनता असुरक्षित असल्याचा उल्लेखही केला होता. त्याचा प्रत्यय यावेळी अनेकांना लगेच पहायला मिळाला.
---------------------------
ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 9146410937 हा आमचा नंबर
----------------------------
आंदोलन आटोपल्यानंतर पोलीस ठाण्यात मात्र फिर्याद देण्यास कोणी फिरकेनात. ज्यांचे खिसे साफ करताना रंगेहाथ पकडले गेले त्यांनीही आपले पैसे परत मिळाल्याने पोलीस ठाण्यात न येताच काढता पाय घेतला. पक्षाची बदनामी नको म्हणून एका ज्येष्ठ नेत्याच्या दबावामुळे या पाहुण्यांना सोडण्यात आले, अशी चर्चा होती. मात्र, विजय मारुती जाधव (वय 29, रा. मिलिंदनगर, जामखेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशाने टोकदार लोखंडी गज लपविताना आढळून आल्याचा गुन्हा पोलिसांनीच नोंदविला आहे.

हल्लाबोल आंदोलनात खिशांवरच डल्ला..
जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात अनेकांची पाकिटे, सोन्याची चेन व इतर मौल्यवान वस्तू लंपास झाल्या. श्रीगोंदा येथील आंदोलनात तर स्थानिक आमदार राहुल जगताप यांचाच मोबाइल चोरीला गेला. या चोरट्यांचे धाडस जिल्हाभर चर्चेचे विषय ठरले. नेत्यांसोबतच चोरट्यांनीही जिल्हाभर फिरून नागरिकांच्या खिशावरच डल्लाबोल केला. शेवगाव येथे पकडण्यात आलेल्या चोरट्यांची सखोल चौकशी केली असती तर अनेक गुन्हे उघडकीस आले असते. मात्र, त्यांना सोडून देण्यात पुढाऱ्याने केलेली तडजोड चर्चेत आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.