श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दिवसभरात आंदोलने, जनक्षोभ उसळल्यानंतर रात्री छिंदम याला सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात पोलिसांनी अटक केली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
छिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गांधीगिरी केली. सरकारी वकिलांच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली.

ही बाब अतिशय गोपनीय ठेवण्यात आली. त्यानुसार सकाळी लवकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखानाचे निरीक्षक सुरेश सपकाळे आदींनी निवडक कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात छिंदम याला न्यायालयात आणले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर तात्काळ त्याला सबजेलमध्ये हलविण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.