हा हल्लाबोल नव्हे, सत्तेपासून लांब राहिल्याचा “आक्रोश’ : पाचपुते

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सत्ता असताना डल्ला मारणारेच हल्लाबोल करत आहे. हा सर्वसामान्य व शेतकरी वर्गासाठी हल्लाबोल नसून सत्तेपासून लांब राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्रोश आहे,’ अशी खरमरीत टीका माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनावर केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
माउली निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते. श्रीगोंद्यात झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या संदर्भात बोलताना पुढे ते म्हणाले, हल्लाबोल शेतकऱ्यांसाठी होता की विधानसभेचे तिकीट जाहीर करण्यासाठी होता ? तिकीट जाहीर केल्याने माझा फायदाच आहे. 

श्रीगोंद्यात लोकप्रतिनिधीने काहीच कामे केली नाहीत म्हणून हा भपका त्यांनी दाखविला. बारामतीपेक्षा श्रीगोंद्याची निवडणूक ज्यांनी प्रतिष्ठेचे केली ते दुष्काळात श्रीगोंद्यात दिसले का ? असा सवाल उपस्थिती केला. मला मंत्री पदे दिल्याचे सांगितले जाते. मात्र, पक्षासाठी माझेही काही तरी योगदान आहे हे कसे विसरणार? 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पवार साहेबांसोबत कॉंग्रेसमधून सर्वात आधी मी बाहेर पडलो. पक्षासाठी रात्रंदिवस फिरलो. गरज असताना अपक्ष आमदार पक्षात आणले. पवार साहेब हे हिमालयाएवढे उंचीचे आहेत. त्यांच्याविषयी आदर असून त्यांचाच आदर्श ठेवून कामे करतोय. लोकप्रतिनिधी का कमी पडतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.