कोपरगावात कोल्हे - काळे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, 5 जणांवर विनयभंगाचा गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांनी जाहीर सभेत लोकप्रतिनिधींविरूध्द केलेल्या टीकात्मक वक्‍तव्याचे तीव्र पडसाद शनिवारी शहरात उमटले. दरम्यान, आशुतोष काळे यांचा प्रतीकात्मक पुतळा नेत असताना भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विघ्नेश्‍वर चौकात तुफान हाणामारी होऊन राजकीय तणाव निर्माण झाला. या प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर विनयभंगाचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू होते.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शुक्रवारी कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलन सभेत काळे यांनी लोकप्रतिनिधींवर टीकात्मक वक्‍तव्य केले. त्याचे तीव्र पडसाद आज सकाळी उमटले. दरम्यान, भाजपच्या संपर्क कार्यालयात निषेध सभा होऊन कार्यकर्ते काळे यांचा प्रतीकात्मक पुतळा घेऊन गुरुद्वारा रोडवरून विघ्नेश्‍वर चौकात आले असता समोरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव चालून आला. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काळे यांचा प्रतीकात्मक पुतळा हिसकावून घेतला. त्यामुळे वाद होऊन कार्यकर्त्यांचे दोन्ही गट एकमेकांस भिडले. यावेळी 
भाजपच्या महिलांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, महिलांच्या मदतीस धावून आलेले भाजप कार्यकर्ते फिरोज युसूफ पठाण व संतोष परसराम साबळे यांना मारहाण करून चाकुसारख्या धारदार हत्याराने जखमी करण्यात आले. या प्रकाराने संतप्त झालेला भाजप कार्यकर्त्यांचा जमाव शहर पोलीस ठाण्यात गेला. या प्रकरणी भाजप महिला कार्यकर्तीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप गोरक्षनाथ वर्पे, शहराध्यक्ष सुनील वसंत गंगुले, वाल्मिक जयसिंग लहिरे, समीर गोरक्षनाथ वर्पे व हिरामण वसंत गंगुले (सर्व रा. कोपरगाव) यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा तपास शहर पोलीस निरीक्षक दौलत जाधव करीत आहेत.

शहरात तणावपूर्ण शांतता
शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भाजप संपर्क कार्यालय व गौतम बॅंक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.