कोपरगावात अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहरातील महादेव नगर भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईन दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आकाश दीपक पाठक (रा. दत्तनगर) यास गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महादेव नगर भागातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता व दि.१४ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता आरोपी पाठक याने तिला फुस लावून, धाक व पैशाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------------- 
दरम्यान, या संदर्भात पीडित मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडितेच्या आईने शुक्रवारी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पाठक याच्याविरूद्ध लैंगिक अपराधपासून बाल संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास थोरात हे करीत आहेत. मतीमंद मुलीवर अत्याचार होणारी त्याच परिसरातील ही दुसरी घटना असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.