मनपातील उपमहापौरांचे कार्यालय महिला शिवसैनिकांनी फोडले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे महापालिका कार्यालयातील कार्यालय महिला शिवसैनिकांनी फोडले. महिला शिवसैनिक स्मिता आष्टेकर आणि कमल जाधव यांनी हे धाडस दाखविले. शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व काही कार्यकर्ते येथे आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. कार्यालयाच्या दरवाजावर असलेली उपमहापौर यांचे नावफलक देखील उखडून टाकून तो कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आला. दरम्यान, महापालिकेच्या कर्मचारी संघटनेने अत्यावश्यक सेवा वगळून काम बंद ठेवले होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उपमहापौर छिंदम यांचा मुकादम अशोक बिडवे यांच्याशी बोलताना शिवाजी महाराज यांच्याविषयी वाचा चांगली घसरली. बिडवे यांना देखील अपशब्द वापरले. या संभाषणाची रेकॉर्डिंग क्लिप बिडवे यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवली. त्यानंतर मात्र, कर्मचारी व अधिकारी उपमहापौर यांच्या वक्तव्याच्या निषेधाबरोबरच अटक करण्याच्या मागणीसाठी गेटवर धावले. त्यानंतर मात्र, ही क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याचे शहरासह जिल्ह्यात पडसाद उमटले. सकाळी अकरा वाजेपर्यंत ही क्लिप संपूर्ण राज्यात आणि देशात व्हायरल झाली. उपमहापौर यांच्या वक्तव्याचा निषेधासाठी हिंदूत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या. दिल्ली दरवाजा येथील कार्यालयावर काहींनी हल्ला केला. दगडफेक केली. घरावर देखील हल्ला करत तेथील वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर काहींनी महापालिकेच्या कार्यालयात धाव घेतली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर व काही कार्यकर्ते महापालिकेच्या कार्यालयात घुसून घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी तिथे महिला शिवसैनिक स्मिता अष्टेकर आणि कमल जाधव या देखील तिथे आल्या. त्यांनी थेट उपमहापौर कार्यालयाकडे धाव घेतली. स्मिता अष्टेकर यांनी दांडके घेत ते कार्यालय फोडण्यास सुरूवात केली. याचवेळी तिथे जमलेल्या हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम यांचे नावफलक उखडून टाकले. ते नावफलक महापालिकेच्या एका कोपऱ्यातील पिकदाणीत होते. 

या वेगवाग घडामोडीनंतर महापालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त आला. पोलिसांनी काहींची धरपडक करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. महिला शिवसैनिक स्मिता अष्टेकर आणि कमल जाधव यांनी महिला पोलीस कर्मचारी असेल, तर अंगाला हात लावा, असे आव्हान पोलिसांना दिले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना काहीच करता आले नाही. दरम्यान, महापालिका बंद करण्याचे आवाहन युनियनने केले. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची विनंती केली. युनियनने त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. अत्यावश्यक असलेल्या सेवा मात्र चालू होत्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.