पारनेरच्या बड्या उद्योगपतीला जामीन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 390 कोटी रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महसूल विभागाने केलेल्या कारवाईनंतर तालुक्यातील भाळवणी गणाच्या पंचायत समिती सदस्या सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते यांना तब्बल दोन महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मुंबईतील आयात-निर्यात व्यापारातून अल्पावधीतच उद्योजक सुरेश धुरपते यांच्या 'संकेत ओव्हरसीज' या खासगी कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यावधींची गुंतवणूक केली. कंपनीतील अंतर्गत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सहा महिन्यांपूर्वी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने नोटीस बजावली होती.

मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने धुरपते यांच्यावर अटकेची कारवाई १४ डिसेंबर रोजी झालेली होती. या कारवाईत कंपनीचे व्यवहार गोठविण्यात आले. सध्या आर्थिक व्यवहारसंबंधी चौकशी सुरू आहे. धुरपते यांना सोमवारी (दि.१२) जामीन मंजूर झाला आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांसह भाळवणी गणातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

लवकरच या संकटातून बाहेर पडेल : धुरपते
गेल्या अनेक वर्षांपासून संकेत ओव्हरसीज कंपनीच्या माध्यमातून आयात-निर्यात व्यापारासंबंधी काम सुरू आहेे. कामकाज सांभाळताना कागदपत्रांची पुर्तता करण्याकडे दुर्लक्ष झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आपण निर्दोष असल्याचे सिध्द होईल. जामगावचे आमचे ग्रामदैवत मळगंगा माता, साईबाबांचे आशीर्वाद व ग्रामस्थांच्या प्रेमामुळे या संकटातून लवकरच बाहेर पडेल, असा विश्वास उद्योजक सुरेश धुरपते यांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.