नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीचाच खासदार होईल ! अजित पवारांचा विखे पाटलांना इशारा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच राष्ट्रवादीकडे राहिला आहे. यावेळी देखील हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असून, नगर दक्षिणेतून राष्ट्रवादीचाच खासदार होईल, असा विश्‍वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंद्यातील “हल्लाबोल’ आंदोलनात बोलताना व्यक्त करत.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा दिला.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगर जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य केले. विरोधी पक्षांचा समाचार घेतांना आपल्या मित्र पक्षाला देखील त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. 

यावेळी बोलताना नेते पवार म्हणाले की , नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागाचा खासदार हा आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा असणार आहे. या जागेवर राष्ट्रवादीचा हक्क असल्यामुळे भविष्यात मित्र पक्षाला ही जागा सोडण्याचा विचारच नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. पण असे सांगीतले. 

नगर दक्षिण मतदार संघातून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे हे नगर दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी त्यादृष्टीने मतदार संघात साखर पेरणी सुरु केली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.