उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : उपमहापौर श्रीपाद छिंदमयांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदम यांनी शिवरायांबद्दल अपशब्द वापरले. त्याची क्लिप व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली. शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.