उपमहापौर छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर आज संतप्त जमावाने दगडफेक केली. या वेळी शिवसेनेसह शिवप्रेमी संघटनांकडून उपमहापौरांचा निषेध करण्यात आला. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा धडक मोर्चा काढण्यात आला. या प्रकारानंतर शिवसेनेने छिंदम यांच्या अटकेची व राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मनपा कर्मचार्‍याची खरडपट्टी काढताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, कर्मचार्‍याने युनियनकडेही याबाबत तक्रार केली होती. या प्रकाराची गंभीर दखल शिवप्रेमींनी घेतली आहे.
-----------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.