राहाता नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राहाता नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक सागर निवृत्ती लुटे यांच्याविरुध्द बालकांचा लैगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलिसांनी लुटे यांच्याविरुध्द विनयभंग, धमकावणे व बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझ्या अल्पवयीन मुलीस सागर लुटे गेल्या महिन्याभरापासून रस्त्याने जाताना व येताना टोमणे मारतो, लज्जा उत्पन्न होईल असे अश्‍लील बोलतो, तसेच जर तू मोबाइल घेतला नाही तर तुझ्याकडे पाहील, अशी धमकी बुधवारी (दि. 14 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता राहाता बसस्थानकात दिली असल्याचे म्हटले. यापूर्वी राहाता नगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सागर लुटेविरुध्द शिर्डी उपविभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी नुकतीच हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचे आदेश काढलेले असून, याबाबतची सुनावणी चालू आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी नगरसेवक सागर लुटेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.